मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना काँग्रेससोबत जाण्याची इच्छा असल्यास त्यांनी जावं पण मतदार मात्र भाजपसोबतच राहतील, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मुंबईतील योग इन्स्टिट्यूटमध्ये ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांनी येत्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यावरून आठवलेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करावी, असा सल्लाही यावेळी आठवलेंनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!
-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!
-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!
-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण