Loading...

शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती, पाहा कोण म्हणतंय…

ठाणे |  शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती…. असं विडंबन काव्य करत राजकारण्यांना चिमटे घेत आणि सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य करत प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी नेते, साहित्यिक आणि पत्रकार आचार्य अत्रे यांच्या आठवणी जागवल्या.

आचार्य अत्रे यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रामदास फुटाणे यांना आचार्य अत्रे मानचिन्हाने गौरविण्यात आले. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी फुटाणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Loading...

कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीची भिती आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हे काही कळत नाही. आज आचार्य अत्रे असते तर सगळ्यांना झोडपून काढलं असतं, असं फुटाणे म्हणाले.

दरम्यान, देशात आज अस्थिरता असून हिंसाचार वाढला आहे. खऱ्या अर्थाने आज अत्रेंच्या लेखणीची गरज आहे, असंही फुटाणे म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्यदिन साजरा करणार

-सुषमाजींनी ‘प्रोटोकाॅल’ला ‘पीपल्स काॅल’मध्ये बदललं- नरेंद्र मोदी

-सुषमा स्वराज यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं; नरेंद्र मोदी भावूक

Loading...

-मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या वेळापत्रकात पूरस्थितीमुळे बदल

-“जनाची नाही मनाची असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत”

Loading...