शिवसेनेच्या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप!
मुंबई | शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम (Ramdas Kadam) चर्चेत आले होते. त्यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचे बंड आणि आताचे हाल पहावत नाहीत असं म्हटलं होतं आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दुजाभाव करतात, त्यांना मराठा नेत्यांना मोठे होऊन द्यायचे नाही. त्यांना मराठा नेत्यांना संपवायचे आहे. नारायण राणे (Narayan Rane), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) ही त्याची उदाहारणे आहेत. कोणत्याच मराठा नेत्याला ते मोठे होऊ देत नाहीत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला.
उद्धव ठाकरेंनी मागील तीन वर्षे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मला बोलू दिलं नाही. माझ्या खात्यात घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) परस्पर जाहीर केले, असे आरोप रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंवर केलेत. आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल भाजपचे नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. पण ते त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री म्हणून करत आहेत. त्यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास कदम म्हणाले, मी पण त्यांना माजी मुख्यमंत्रीच म्हणेन. मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख बोललो असतो पण ते सध्या बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचाराने काम करतात. त्यामुळे मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणू इच्छित नाही.
थोडक्यात बातम्या –
“नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात”
‘सत्तेत असो किंवा नसो अजित पवार नेहमी…’, अनिल बोंडेंची बोचरी टीका
‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…
वाढदिवस उद्धव ठाकरेंचा पण चर्चा होतेय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांची
रक्षाबंधनला भावाकडे जाऊ न शकणाऱ्या बहिणींसाठी खुशखबर! टपाल विभागाचा मोठा निर्णय
Comments are closed.