Top News

प्लास्टिक बंदीवर राज्य सरकारचं एक पाऊल मागे; मोठा निर्णय जाहीर

मुंबई | प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. बॅकफूटवर गेलेल्या राज्य सरकारनं या प्रकरणी आता एक पाऊल मागे टाकलं आहे. छोट्या दुकानदारांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 

छोट्या दुकानदारांवरील पॅकिंगची बंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबतची माहिती दिली. 

पाव किलोंपेक्षा अधिकच्या पॅकिंगसाठी छोट्या दुकानदारांना मुभा देण्यात येणार आहे. उद्यापासून छोट्या दुकानदारांना हा दिलासा मिळणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-कोण होतास तू? काय झालास तू?, राजू शेट्टींनी उडवली सदाभाऊंची खिल्ली

-भुजबळांना न्यायालयाकडून दिलासा; तुर्तास अटक नाही!

-रस्त्याच्या कामाची चौकशी करा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र!

-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!

-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या