बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं’; रामदास कदम ढसाढसा रडले

मुंबई | शिवसेनेतील (Shivsena) बंडामागची कारणं शोधणं हा मोठा गहन आणि शोधाचा विषय आहे. त्यावर एखादा उत्सुक विद्यार्थी पी. एच. डी. करु शकेल इतके त्या विषयाला महत्व प्राप्त झालं आहे. तरी तुर्तास महाराष्ट्रातील राजकारणी जे सांगत आहेत किंवा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यावरुन शिवसेना कोणी फोडली याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो.

शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आता खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी रोजी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आरोप केले आहेत. कदम यांनी शिवसेना शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी फोडली असा आरोप केला आहे.

अजित पवारांच्या मोठ्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी शिवसेना फोडली. मला शिवसेना कोसळताना पहावत नाही. आज मी 70 वर्षांचा असून गेली 52 वर्षे मी शिवसेनेसाठी काम करत आहे, असं यावेळी रामदास कदम म्हणाले. पत्रकार परिषदेत हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. मी शिवसेनेसाठी अनेक आंदोलने केली आणि माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या पक्षबांधणीत माझा वाटा आहे. तरी देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मला साहेब बोलावं लागतं, असं यावेळी कदम म्हणाले.

मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अखेर पर्यंत माझ्या हातात भगवाच असेल. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली. आमचे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ऐकलं नाही, असं देखील कदम यावेळी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

राष्ट्रपती निवडणुकीत ‘त्या’ आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका!

शिवसेना खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोदींना भेटणार?, फक्त हे 6 खासदार ठाकरेंसोबत!

कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘ही’ लक्षणे आढळल्यास ताबडतोब हॉस्पिटल गाठा

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More