बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नेत्यानं शिवसेनेच्याच मंत्र्यावर गंभीर आरोप केल्यानं खळबळ

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्याच पक्षातील एका मंत्र्यावर गंभीर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकाच्या चौकशीवरून शिवसेनेचा एक मंत्री गृह राज्यमंत्र्यावर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनासदृश्य परिस्थिती असताना राज्यसरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. रत्नागिरीमध्ये रात्रंदिवस क्रिकेट खेळण्याची परवानगी कशी मिळते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित क्रिकेट सामन्याच्या बॅनरवर पोलिस निरीक्षक सूवर्णा पत्की यांचे फोटो झळकले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांचे फोटो असे बॅनरवर येणं योग्य नाही असं मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणातील फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि मी स्वतः गृहमंत्र्यांना 6 वेळा फोटोसहित पत्र दिले आहे. पण त्यांनी अद्यापही संबंधित प्रकरणात दखल घेतलेली नाही. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री असूनही त्यांना या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी वाटली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

सुवर्णा पत्की या पोलिस अधिकाऱ्यावर शिवसेनेच्या कोकणातील एका मंत्र्याचा आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षाने त्या मंत्र्याचे नाव घोषित करण्याचं आवाहन केलं. त्यावर, मी नोटीस देऊन नाव घेऊ शकतो त्यात मला काहीच अडचण नाही. असे सांगतानाच गृहमंत्र्यांनी दबाव नसेल तर त्वरित कारवाई करावी मला उपोषणाला बसण्याची वेळ त्यांनी आणु नये अशा शब्दात त्यांनी गृहमंत्र्यांना इशारा दिला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन रामदास कदम यांना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ

आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी

धक्कादायक!; मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ

छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित- नाना पटोले

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More