बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण!

मुंबई | राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच रामदास कदमांनी कोरोनाची लस घेतली होती. तसेच त्यांनी लस घेतल्याची माहितीही ट्विट करत दिली होती. आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती. लसीकरणानंतरही मास्क वापरणं, सुरक्षित अंतर ठेवणं आणि सतत हात धुवणं या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन सर्वांनी करावं, असंही रामदास कदम यांनी ट्विट करत सांगितलं होतं.

राज्यात सोमवारी 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान कालपेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. मात्र रविवार असल्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात रविवारी मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक

‘उद्धवजी, समस्या ही आहे की…’; लॉकडाऊनवरून आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

जाणुन घ्या… महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पेट्रोलपंप, हॉटेलसाठी नवीन नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More