Aditya Thackeray | उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सभेत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. सरकार आलं की यांना मी बर्फाचे लादीवर झोपवतो असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यालाच रामदास कदम यांनी कडव्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणाचा देखील उल्लेख करत सज्जड इशारा दिलाय. (Aditya Thackeray )
बर्फावर झोपायची भाषा कोणाला करता, आधी तुमचं सरकार तरी येऊ दे कोण तुम्हाला निवडून देणार आहे असं म्हणत दिशा सालियानचे प्रकरण मी पुन्हा काढणार, रात्री बारा वाजता जातोस सकाळी पाच वाजता येतो तुझे धंदे काय? हे सगळे समजले पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले आहेत.
रामदास कदम यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
आपलं वय किती आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान तरी जरा ठेव, लादीवर झोपायच्या गोष्टी कोणाला करता अरे तुमचं पक्षासाठी योगदान काय? कोण आहेस तू?, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. देवाने तोंड दिलं म्हणून काहीही बोलता. नारायण राणे आणि राज ठाकरे पक्ष सोडून गेले त्या वेळेला तुझा बाप उद्धव ठाकरे मला गाडीत पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय एक वर्ष मातोश्रीवरून खाली उतरत नव्हता.तुझ्या बापाला हे सगळं विचार मग मला बोल, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) सुनावले.
“काका-काका म्हणत माझ्याच पाठीत खंजीर..”
मविआ सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी पहिल्या एक वर्षात फक्त भोपळा दिला. पण, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोट्यवधी रुपये त्यांनी कोकणासाठी दिले. त्यामुळेच योगेश कदम यांनी अडीच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या काळात आणलाय. आदित्य तुम्ही इथे येऊन कितीही जरी कावकाव केलीत तरी योगेश कदम पन्नास हजारच्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास देखील रामदास कदम यांनी व्यक्त केलाय.
“काका म्हणत माझ्या ऑफिसमध्ये यायचं माझ्याकडून शिकून घेतलं आणि तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. माझ्याकडे जे पर्यावरण खातं होतं तेच खाते तू घेऊन बसलास बेइमानी केलीस. त्यामुळे आदित्यजी गद्दाराची भाषा तुम्ही बोलू नका. गद्दारी तुम्ही केलीत, गद्दार तू आहेस.”,असं रामदास कदम म्हणाले. (Aditya Thackeray )
News Title : Ramdas Kadam on Aditya Thackeray Criticism
महत्वाच्या बातम्या –
आज कार्तिक पौर्णिमेला ‘या’ राशींवर राहणार विष्णुदेव व लक्ष्मीची कृपा!
संभाजी पाटील निलंगेकरांचा वंचित बहुजन आघाडीला झटका!
ऐश्वर्याला धोका दिल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
आनंदवार्ता! लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; 1 ग्रॅमसाठी मोजा फक्त ‘इतके’ रुपये
अजित पवार गटाला वडगाव शेरीत मोठा धक्का, टिंगरेंसह ‘या’ बड्या नेत्यांनी तुतारी फुंकली