Top News

उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

जालना | आगामी निवडणुकीत भाजपला चांगलाच धडा शिकवू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. ते जालन्यातील शिवसेना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. 

शिवसेनेचे बोट धरून भाजपने महाराष्ट्रात प्रवेश केला. आज याच भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहं. आता आपण गाफील राहून चालणार नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, भाजपने युती तोडली तरीही गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या. आगामी निवडणुकीत स्वबळावरच विधानसभेवर सेनेचा भगवा फडकवू, असं कदम म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

-काँग्रेस दहशतवाद्यांचं मनोबल वाढवतंय; रवीशंकर प्रसाद यांची टीका

-घाटकोपर विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पहा व्हीडिओ

-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी

-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या