बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

मुंबई | शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर एका मागे एक धक्के बसत आहेत. शिवसेनचे हक्काचे म्हणता येण्यासारख्या नेत्यांकडून शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली जात आहे. तर काही बंडखोरांना शिवसेनाच नारळ देत आहे. शिवसेनेचे मोठे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी शिवसेनेला राजीनामा दिला आहे.

कदम यांचे पुत्र याआधी आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) एकनाथ शिंदे गटाला मिळाले होते. रामदास कदम हे शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते (Opposition Leader) सुद्धा राहिले आहेत. रामदास कदम 2014 सालच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis Government) सरकारमध्ये पर्यावरण मंत्री (Environment Minister) देखील होते.

रामदास कदम यांचा मुलगा दापोली विधानसभा मतदार संघातून आमदार आहे. शिवसेनेतून बंडखोर आमदारांना घेऊन जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते, तेव्हा योगेश कदम देखील त्यांच्यासोबत होते.

शिवसेनेतून पक्षगळती काही केल्या थांबायला तयार नाही. यापूर्वी शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीअंश आमदार शिंदे गटाकडे होते. नंतर अनेक जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांनी त्यांच्या बंडला साथ दिली. नुकताच शिवसेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे.

थोडक्यात बातम्या –

इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट, म्हणाली ‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्या’, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

गेले ते बेंटेक्स,राहिले ते सोने म्हणणारे खासदार स्वत:च शिंदे गटात; ‘या’ कारणामुळे दिला सेनेला धक्का

मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटिओ टेस्टची गरज नाही, वाचा सविस्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More