Ramdas Kadam l शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, “त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतले नसते, तर शिवसेना फुटली नसती” असा दावा केला. तसेच, “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? पण त्यांनी तसं केलं नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली.
रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा :
रत्नागिरीतील सभेत बोलताना रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर गंभीर आरोप केले. “आज उद्धव ठाकरेंबरोबर जे १०-१५ लोक आहेत, त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावं लागेल. आम्हाला माहीत आहे, लंडनमध्ये तुमचं काय आहे, अमेरिकेत काय आहे, श्रीलंकेत काय आहे,” असं रामदास कदम म्हणालेत.
“आम्हीही ५० वर्ष मातोश्रीसोबत घालवली आहेत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलाल, तर याद ठेवा,” असा थेट दिला.
या कार्यक्रमात माजी आमदार सुभाष बने (Subhash Bane), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने (Rohan Bane), पराग बने (Parag Bane), माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक (Rajendra Mahadik), जिल्हा प्रमुख विलास चाळके (Vilas Chalke), माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक (Rachana Mahadik) यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
Ramdas Kadam l “रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री पहिला नाही” :
रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कामाचे कौतुक करत “मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो, पण एवढ्या मेहनतीने रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री पहिला नाही,” असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना सर्व काही आयतं मिळालं. बाळासाहेबांनी कमावलेलं तुम्ही उपभोगत आहात. मात्र, कोकणात भगवी लाट आहे, आणि ती केवळ एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.