“…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल”

रत्नागिरी | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे काल जाहीर सभा झाली. खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group), रामदास कदम (Ramdas Kadam), योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदम यांनी आज प्रत्युत्तर दिले. उद्धव साहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आला तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितलंय.

उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आलात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो. याचा मी साक्षीदार आहे, असं कदम म्हणालेत.

मी केशवराव भोसलेंचा (Keshavrao Bhosle) ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेल, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल,असे आव्हान कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

महत्त्वाच्या बातम्या-