कोण होणार अहमदनगरचा महापौर?; शिवसेनेचे रामदास कदम ठरवणार…

अहमदनगर | शिवसेनेच्या नवनिर्वाचीत 8 नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे महापौर होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान, नगर महापालिकेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी रामदास कदम यांच्याकडे दिली आहे.

नगरच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांनी शनिवारी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महापालिका निवडणुकीच्या नव्या पक्षीय बलाबलानुसार सर्वाधिक 24 जागा असल्याने शिवसेनेचा महापौर होण्याची जास्त संधी आहे. 

दरम्यान, मुंबईतील भेटीवेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, पर्यावरण मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर इ. नेते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

-लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत- राज ठाकरे

-काश्मीरात रक्तपात; 7 नागरिक, 3 अतिरेकी आणि 1 जवान शहीद

-“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!

-देशाची सुरक्षा काँग्रेससाठी पैसे कमवण्याचा मार्ग; न्यायालयाच्या निकालानंतर मोदींचा हल्लाबोल

-उत्तर भारतीयांना आरक्षण द्या- संजय निरुपम