बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत रामदास कदम यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, म्हणाले…

मुंबई |  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आरोपासंदर्भात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी 6 ऑक्टोबर राजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. अनिल परब यांच्या करण्यात आलेल्या आरोपाबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावरून उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आज शिवसेनेचा दसरा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडत आहे. या मेळ्याव्यासाठी रामदास कदम उपस्थितीत राहणार की नाहीत, याबाबतही चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांना ऑडिओ क्लिपबद्दल देखील आपल्या वेदना पत्राद्वारे कळवल्या आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. अनिल परब यांच्यावरील भष्ट्राचाराप्रकरणी सोमय्यांना शिवसेनेच्याच एका मंत्र्यांनी पूरावे पाठवल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस वैभव खेडकर यांनी केला आहे. या प्रकरणात रामदास कदम यांचं नाव सध्या चर्चेत आहे.

वैभव खेडकर यांनी या प्रकरणाबाबत रामदास कदम यांचं थेट नाव घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा सवांद असल्याचं समजत आहे. परंतु रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात केला आहे. तसेच आज होत असलेल्या शिवसेना मेळ्याव्याला रामदास कदम हे उपस्थित राहणार नाहीत. गेले तीन महिने रामदास कदम यांच्यावर ब्रीज कॅंडी रूग्णालयात त्यानंतर त्यांच्या घरी दोन महिने उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ असल्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय कदम यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

मोठी बातमी! सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More