देश

हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी निधी द्यावा- रामदेव बाबा

नवी दिल्ली | अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर आज निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रामदेव बाबा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता अयोध्येत राममंदिर उभारावं आणि मशीद उभारणीसाठी हिंदू बांधवांनी निधी द्यावा, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर समाजात भिती निर्माण होऊन तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका. सर्व भारतवासियांनी आनंद जरूर साजरा करा पण कायद्याचं देखील पालन करा, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

देशातील बहुसंख्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आजचा निर्णय दिल्याने आज अतिशय आनंद झाला आहे, असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये वादग्रस्त जागेचा निर्णय अत्यंत संवेदनशील होता. शिया वक्फ बोर्डाचा आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने या जागेचा मालकी हक्क रामलल्ला न्यासाचा असल्याचा निर्णय दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या