देहरादून | योगगुरु रामदेव बाबा यांनी गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं जाहीर केलं. त्यानंतर लगेच त्याचदिवशी संध्याकाळी केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. या बंदीनंतर रामदेव बाबा यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली गेली. या सर्व प्रकरणावर आज रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
पतंजलीने जे काम केलं त्याची स्तुती करावी, असा माझा आग्रह नाही. आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही. मात्र तिरस्कार तरी करु नका, असं रामदेव बाब यांनी म्हटलंय.
पतंजलीने केलेल्या प्रयत्नात तीन दिवसात 69 टक्के आणि सात दिवसात शंभर टक्के रुग्ण बरे झाले. त्याची सविस्तर माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे, असं स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिलंय.
कोरोनिल औषधाच्या प्रयोगासाठी ज्यांची परवानगी घ्यायची होती, त्या सर्वांचे प्रमाणमंत्र आम्ही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत, असं रामदेव बाबा म्हणाले. याशिवाय पतंजलीच्या प्रयत्नाचं आयुष मंत्रालयाने कौतुक केलं आहे, असं देखील रामदेव बाबांनी यावेळी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
महत्वाच्या बातम्या-
आषाढी एकादशीनिमित्त अमिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीमध्ये शुभेच्छा, म्हणाले….
‘साहेब माझा विठ्ठल’, पुढचा 1 महिना आव्हाड करणार पवारांवर ‘खास सिरीज’!
भारताविरोधात चीनची नवी खेळी; भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी