बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’

नवी दिल्ली | रामदेव बाबा यांनी कोरोना संक्रमणाबाबत बोलत अॅलिओपॅथी औषधांच्या साईट इफेक्टबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यानंतर वादाला सुरुवात झाली होती. मात्र आता आपल्या पहिल्या वक्तव्यावरुन रामदेव बाबांनी यू टर्न घेतला आहे.

रामदेव बाबांनी आपण कोरोना लस घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर आता त्यांनी डॉक्टर देवदूत असल्याचंही म्हटलं आहे. ते हरिद्वारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लसीचे दोन्ही डोस घेऊन योग आणि आयुर्वेदाच्या डबल प्रोटेक्शनचा लाभ घ्या. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही, असं रामदेव बाबा म्हणाले.

कोणत्याही संघटनेसोबत माझी दुश्मनी असू शकत नाही. मी केवळ औषधांच्या नावानं सुरू असलेल्या लोकांच्या शोषणाविरोधात होतो, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. पंतप्रधान जन औषधी केंद्र उघडण्याची गरज पडली कारण डॉक्टर अनेकदा साध्या औषधांच्या जागी महागडी औषधे देत असतात. मात्र, प्रत्यक्षात ती अत्यंत स्वस्त असतात, असं ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More