देश

रामदेव बाबांचं डाॅ.आंबेडकर आणि पेरीयारांसंबधी वादग्रस्त वक्तव्य, नेटकरी म्हणतात ‘बाबा’ला अटक करा!

नवी दिल्ली| डॉ. आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी हे वैचारिक दहशदवादी आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी नेटकरी सध्या करू लागले आहेत.

ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. मला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही पटतात पण त्यांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी दलितांमध्ये भेदभाव करीत नाही. मात्र, वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवे, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

रामदेव बाबा यांच्या याच वक्तव्याप्रकरणी नेटकरी चांगलेच खवळले आहेत. त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी ते करत आहेत. ट्वीटरवर याचा ट्रेंडदेखील सुरू झाला आहे. इतकंच नाहीतर पतंजलीच्या उत्पादनावर देखील बंदी घालण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

दरम्यान, ट्वीटरवर रामदेवबाबांचा निषेध करण्यासाठी #Arrestramdevbaba आणि #BoucottPantanjali असा ट्रेंड सध्या सु्रू झाला आहे.

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या