बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी मी भाजपतच राहणार”

बंगळुरू | काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. रमेश जारकीहोली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे भाजपची बदनामी झाली होती. आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत.

जारकीहोली यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कर्नाटकातील राजकीय स्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. रमेश जारकीहोली यांनी देवेंद्र फडणवीस त्यांचे गॉडफादर असल्याचं म्हटलंय. तसेच आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचंही रमेश जारकीहोली यांनी स्पष्ट केलं आहे.

मी माझ्या नाराजीबद्दल केवळ जवळच्या मित्र आणि अनुयायांसोबतच चर्चा केली होती. ही माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहचली याची मला कल्पना नाही. मात्र, मित्र, शुभचिंतक आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याचा विचार सोडून दिलाय. मी याबाबत खोट बोलणार नाही. हे खरं आहे की मी मुंबईला माझे गॉडफादर देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो. यात मी त्यांच्याशी पक्षामधील नाराजीसह राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली, असं रमेश जारकीहोली यांनी सांगितलं.

मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. म्हणूनच मी त्यांची भेट घेतली. RSS आणि BJP ने मला सन्मान दिलाय. काँग्रेसमध्ये मी 20 वर्षे असताना हा सन्मान मला कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडतं जहाज आहे. मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा विचारही करत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का; निवडणूक पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

‘महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आरक्षण टिकलं नाही’; दरेकरांचा हल्लाबोल

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More