तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप मंत्र्याचा राजीनामा
कोल्हापूर | पुजा चव्हाण प्रकरणात भाजपने संजय राठोडांवर जोरदार आक्रमण करुन त्यांना अखेर राजीनामा द्यायला लावला होता. मात्र आता भाजप मंत्र्याचीच अश्लील व्हिडीओ क्लीप समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे कर्नाटकातील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी या प्रकरणात अडकले आहेत, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
रमेश जारकीहोळी यांचा एक अश्लील व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेला कर्नाटक पाॅवर ट्रान्समिशन काॅर्पोरेशन लिमीटेडमध्ये नोकरी देण्याचं अमिष दाखवून ते पूर्ण न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. एवढचं नाही तर सदर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेचा व्हीडिओ सामाजिक कार्यकर्ते कल्लाहोळी यांनी सोशल मीडियावर टाकला होता, मात्र या प्रकरणामुळे जारकीहोळींनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्ष काँग्रेसनी केली होती.
बंगळुरु पोलीस आयुक्त्याकडे तक्रार नोंदवताना कल्लाहोळी यांनी महिलेच्या जीवाला धोका आसल्याचं कारण देत तीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. तसेच योग्य तो न्याय मिळवून देण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. कर्नाटकच्या गृहमंत्र्यानी दिलेल्या अश्वासनानुसार या प्रकरणाची कायदेशीर चौकशी केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. एवढचं नाही तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएन नारायण यांनी हे सुडाचं राजकरण असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एवढचं नाही तर जारकीहोळींच्या या प्रकरणामुळे येडीयुरप्पा सरकारची बदनामी झाल्याची चर्चा समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जनता दल सेक्युलर मधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या 17 आमदारांमध्ये जारकीहोळींचा समावेश होता.
संबंधित बातम्या-
धक्कादायक! मंत्र्याच्या सेक्स सीडीतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
भाजप मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल चोरांचा थेट पाईपलाईनवर डल्ला; पेट्रोलनं दोन विहिरी भरल्यानं महाराष्ट्रात खळबळ
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ बड्या टोळीच्या म्होरक्याला केलं अटक
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ कामात घोटाळा झाला का? होणार चौकशी
बिपाशा बासूचा हॉट अंदाज; नवऱ्याला म्हणाली ‘जळतंय माकडं’; पाहा व्हिडीओ
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!
Comments are closed.