बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नेहरु असतानाच हिंदू मारले गेले, देवाचे आभार माना की RSSचा जन्म झाला”

नवी दिल्ली | आज देशात आरएसएसवाल्या भाजपची सत्ता आहे. त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता होण्याच्या नात्यानं मी अन्य विचारधारांसोबत तडजोड करु शकतो. मात्र, भाजप आणि संघाच्या विचारधारेशी कधीही नाही, असं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संघावर निशाणा साधला. यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचं दिसतंय.

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपचे भोपाळमधील आमदार रामेश्वर शर्मा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच ‘हिंदूविरोधी’ वक्तव्याप्रकरणी रामेश्वर शर्मा राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

मी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करणार आहे. त्यांनी हिंदू देवी, देवतांचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागायला हवी. तुमची आई आणि बहिणीचा नवरा हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे तुमच्यात हिंदूंचं रक्त आहे असं दिसत नाही, अशी बोचरी टीका रामेश्वर शर्मा यांनी केली आहे.

आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही, असं प्रत्युत्तर रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींना दिलं आहे. तसेच नेहरु असतानाच देशाचं विभाजन झालं, हजारो हिंदू मारले गेले. देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला, असंही रामेश्वर शर्मा म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

“गरीब देश कोरोनाने चिरडलेत, लसीकरणासाठी त्यांना मदत करायलाच हवी”

टाइम्स मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दहशतवादी मुल्ला बरादरचा समावेश!

गरिबांचा मसीहा सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा, तब्बल 20 तास केली झाडाझडती

‘देव तारी त्याला कोण मारी’; बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More