बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरीबाचा एम.एस. धोनी”

नवी दिल्ली | महेंद्रसिंग धोनीला भारताचा सर्वात कुल कॅप्टन म्हटलं जातं. तर पाकिस्तान क्रिकेट संघात मिस्बाह-उल-हक याला सर्वात शांत स्वभावाचा खेळाडू समजलं जातं. मिस्बाह सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. पाकिस्तानच्या मागील काही सामन्यात झालेल्या नाचक्कीमुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीज राजा याने मिस्बाह-उल-हकला गरीबाचा एम.एस. धोनी म्हटलं आहे.

मागील वर्षभरापासून पाकिस्तानचा संघ खराब कामगिरी करताना दिसत आहे. मागील न्युझीलंड दौऱ्यात देखील टी-20 आणि कसोटी मालिकेत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. यासाठी रमीक राजाने पाकिस्तान क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक याला जबाबदार धरलं आहे. धोनी आणि मिस्बाह यांचा स्वभाव मिळता जुळता आहे. त्याला गरीबांचा धोनी म्हणणं चुकीचं ठरणार नाही, असं रमीज म्हणाला.

आधुनिक क्रिकेटच्या हिशोबाने त्याला त्याच्या स्वभावात बदल करणं गरजेचं आहे. पाकिस्तान संघ आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. मिस्बाहच्या मार्गदर्शनाखाली संघ खूप बचावात्मक पद्धतीने खेळत आहे. त्यामुळे संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. संघाने आक्रमक खेळ करून पराभवातून बाहेर पडायला हवं, असं रमीज म्हणाला.

दरम्यान, क्रिकेटबाज या युट्युब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे बोलून दाखवलं. पाकिस्तान संघाला फक्त त्यांच्या बचावात्मक शैलीमुळं नाही तर त्यांच्या खराब फलंदाजीमुळे सुद्धा पराभवाचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेरावं घालावे लागेल’- अतुल भातखळकर

आई-वडिलांच्या लग्नात चिमुकलीचा हायव्होल्टेज ड्रामा ; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दहावी आणि बारावी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या…

…म्हणून महिलेने तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी न्यायालयात मागितली परवानगी!

‘ती’ 45 मिनटं आमच्यासाठी खूप मोठी…; व्हाॅटस अॅपने मानले यूझर्सचे आभार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More