रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला

नवी दिल्ली | भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरुन बाहेर आल्यानंतर भाजप नेत्यांसह रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी हातात हात घालून माध्यमांना पोझ दिली.

रामनाथ कोविंद यांच्या बाजूने मताधिक्य असल्यानं तेच ही निवडणूक जिंकणार हे स्पष्ट आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या