भुवनेश्वर | भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पुरी येथील जगन्नाथ मंदिरात भेदभाव झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पत्नी सविता कोविंद जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा सेवेकऱ्यांच्या एका गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखले. तसंच राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
दरम्यान या प्रकारानंतर राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदिप्तकुमार मोहापात्रा यांनी गैरप्रकार झाल्याचे मान्य केले असून याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!
-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!
-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!
-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!