देश

पॉक्सो अंतर्गत आरोपीला दया याचिका करण्याची मुभा नसावी- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबई | आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. पॉक्सो अंतर्गत आरोपीला दया याचिका करण्याची मुभा नसावी. संसदेत चर्चा करून या कायद्यात बदल करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे.

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्माने गृहमंत्रायलाकडे दयेची याचिका केली आहे. ती रद्द करावी, अशी शिफारस गृहमंत्रायलाकडून राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. देशभरात सध्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. अशात राष्ट्रपतीच्या या विधानाला विशेष महत्व आहे. 

2012 मध्ये दिल्लीत निर्भयावर बलात्कार झाला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणातील  आरोपी विनय शर्माच्या दया याचिकेवर राष्ट्रपती काय निर्णय घेतात? हा पाहणं महत्वाचं आहे. 

दरम्यान, 28 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये सामुहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर आज या प्रकणातील 4 आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर यावर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर निर्भया प्रकरणातील ही घडामोड महत्वाची आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या