प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद
नवी दिल्ली | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली.
राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात कोरोना काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत, कृषी कायद्यांना दिलेली मंजुरी, आत्मनिर्भर भारत यावर भाष्य केलं.
नुकतंच प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याचा अपमान होणं दुर्दैवी आहे. घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्याच घटनेनं आपल्याला काही कर्तव्यंदेखील सांगितली आहेत, असं रामनाथ कोविंद म्हणाले.
प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च काढला. यावेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकवला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी घटनेनं दिलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
उद्या अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची, आणि…- अजित पवार
मोदी-योगी सरकारला नडतोय एकटा नेता; म्हणाला, “गोळ्या घाला पण मागे हटणार नाही”
शेतकरी नेत्याच्या अश्रूंनी केली कमाल; एका रात्रीत शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं!
…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Video
रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटणार!
Comments are closed.