बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

नवी दिल्ली | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी स्वांतंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं. आता त्याचे चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहे.

महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान तुरुंगात असताना ब्रिटीशांकडे दया याचिका केली होती. असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वाद होण्याची शक्यता आहे.

पुढे राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, ब्रिटिशांनी त्यांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही विशिष्ट विचारसरणीने प्रभावित झालेले लोक अशा राष्ट्रवादी नायकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितलं गेलं.

दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत ही उपस्थित होते. त्यांनीही यावेळी लोकांना संबोधित केलं.

थोडक्यात बातम्या – 

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वसामान्यांना सलग दुसऱ्या दिवशी दिलासा!

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा; वाचा सविस्तर वृत्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More