पुणे महाराष्ट्र

रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

सातारा | जिल्ह्यात जोपर्यंत पिसाळलेली कुत्री आहेत. तो पर्यंत माझी भूमिकाही पिसाळलेलीच असेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंवर जहरी टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मिटिंग बोलावली आहे. त्यात मी त्यांना सांगणार आहे की तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत, असं रामराजेंनी म्हटलं आहे.

रामराजेंनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, रामराजे निंबाळकर विरूद्ध उदयनराजे भोसले हा वाद जुना असून साताऱ्यामध्ये पुन्हा पक्षांतर्गंत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-“देशात आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”

-रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!

आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले

-गुन्हा दाखल झाल्यावर आणि कोर्टाने दिलासा दिल्यावर धनंजय मुंडेंचं आक्रमक ट्वीट

-‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना सुचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या