बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा ‘हा’ अत्यंत विश्वासू सहकारी राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचं समजतंय. रामराजे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

रामराजे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचं पद कायम राहू शकतं, असं बोललं जात आहे.

रामराजे यांनी भाजपकडे तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याचं कळतंय. रामराजेंनी भाजपकडे कुलाबा, फलटण आणि वाई मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती आहे.

दरम्यान, आमदार शिवेंद्रराजेंनी अंतर्गत कलहामुळे भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला होता. आता रामराजे देखील राष्ट्रवादीची साथ सोडणार असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांविरोधातील काँग्रेसची पोलखोल यात्रा ‘या’ कारणामुळे लांबणीवर

-“विरोधी पक्षातील 5 ते 6 सहा आमदार माझ्या संपर्कात; लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार”

–…नाहीतर लोकांना तुमची धुलाई करायला लावेल- नितीन गडकरी

-बिग बॉसच्या घरातील ‘हा’ स्पर्धक बाहेर!

-“नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस चालवणं कठीण आहे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More