नागपूर | महाविकास आघाडी सरकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर मध्य प्रदेशात जसा राजकीय भूकंप झाला तसाच राजकीय भूकंप महाराष्ट्रात देखील होईल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नागपूर ते माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विचार करून भाजप सोबत यावं कारण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरद्ध असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
मध्यप्रदेशमध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटू शकतात. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांना भाजपने फोडलेले नाही. भाजप फो़डाफोडीचे राजकारण करत नसल्याचंही आठवलेंनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींंवर टीका करत आहेत. मात्र ते टीक करून त्यांची स्वत:ची प्रतिमा खराब करत असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी; लवकरच बाजारात होणार उपलब्ध
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर
“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”
Comments are closed.