अहमदनगर महाराष्ट्र

“सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

अहमदनगर | सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यातून अडचणीत आलेला संसार आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आजचं आंदोलन करण्यात आलं आहे. सरकारनं सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

घरातला कर्ता माणूसच कोपर्‍यात जाऊन बसला आहे. नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारनं अनुदानच दिलेलं नाही, अशी टीका देखील शिंदे यांनी यावेळेस केली.

कोरोनाच्या काळात नागरिकांना कसलाच मदतीचा हात सरकारनं दिलेला नाही. फक्त केंद्र सरकारकडेच बोट दाखवायचं काम राज्य सरकार करत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोदींपाठोपाठ ट्रम्प यांचाही चीनला मोठा झटका, अमेरिकेत देखील टिकटॉकवर बंदी!

चिमुरड्यांवर काळाचा घाला! भरधाव वेगानं जाणारा पिकअप चिरडून गेला अन…

कोरोनानं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या छातीत झालीय बुरशी; कोरोनाचं धक्कादायक वास्तव!

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या