विराट-अनुष्कानंतर आता रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा बार उडणार!

मुंबई | विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोनच्या लग्नाचा बार उडणार असल्याचं कळतंय. एका बड्या एन्टरटेन्मेंट पोर्टलने यासंदर्भात वृत्त दिलंय. 

रणवीर-दीपिकाने आपल्या रिलेशनबद्दल खुलेपणानं काहीच सांगितलेलं नाही. मात्र आता त्यांनी हे रिलेशन पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून या वर्षाच्या मध्यापर्यंत ते विवाहबद्ध झालेले असतील, असं कळतंय. 

दरम्यान, विराट-अनुष्का यांच्याप्रमाणे रणवीर-दीपिका डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. बीच पसंत असल्यानं ते बीच वेडिंग करु शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर बंगळुरु आणि मुंबईमध्ये रिशेप्शन असेल असंही कळतंय.