पुणे | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangala) या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत राणा दा- पाठक बाईंची अत्यंत सुंदर प्रेमकहानी दाखवली गेली. या जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यामुळं या जोडीचे अनेक चाहते आहेत.
मालिकेमुळं ही जोडी लोकप्रियेतच्या शिखरावर पोहचली आहे. या जोडीनं त्यांच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी सुखद धक्का दिला. राणा दा-अंजलीनं म्हणजेच अभिनेत्री हार्दिक जोशी(Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) यांनी रिअल लाईमध्येही दोघांचं एकमेकांंवर प्रेम असल्याचं कबूल केलं.
या आनंदाच्या बातमीनंतर सर्वांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली. शुक्रवारी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी हार्दिक-अक्षया लग्न बेडीत अडकले. पुण्यात थाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं.
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकजण कमेंट्सच्या माध्यमातून त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. आता त्यांच्या लग्नापाठोपाठ चर्चा रंगलीय ती त्यांच्या रिसेप्शन पार्टीची.
शुक्रवारी त्यांचा लग्नानंतर डोळ्याचे पारणे फेडणारी रिसेप्शन पार्टी देखील झाली. या पार्टीत दोघांनीही पर्पल रंगाचे कपडे घातले होते. अक्षयानं गळ्यात नेकलेस आणि लग्नातील लांब मंगळसूत्र घातले होते. गळ्यातील मंगळसूत्रामुळं तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं.
या रिसेप्शनचे फोटो अक्षयानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंत तिचे आणि हार्दिकचे आई-बाबा देखील दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या-