उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला निरोप देताना राणा जगजितसिंह यांना अश्रू अनावर झाले. काळजावर दगड ठेवून आपण हा निर्णय घेत असल्याचं राणा जगजितसिंह यांनी सांगितलं आहे.
शरद पवार माझे दैवत होते, आहेत आणि तसेच राहतील. पक्ष सोडला तरी पवार कुटुंबीयांशी आपले चांगले संबंध असतील. अतिशय जड अंत:करणाने मी हा निर्णय घेत आहे, असं म्हणत जगजितसिंह भावूक झाले.
जिल्ह्यातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आणि उस्मानाबादमध्ये हक्काचे पाणी आणणे, यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राणा पाटील यांचे वडील आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी राणा जगजितसिंह यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जगजितसिंह यांना बघून कार्यकर्ते सुद्धा भावूक झाले.
महत्वाच्या बातम्या-
सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपला; भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल! https://t.co/OPh6J3C1ER #BhagatSinghKoshyari
— थोडक्यात (@thodkyaat) September 1, 2019
पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला ट्रोल करणं मूर्खपणाचं- सत्यजित तांबे- https://t.co/IQM0sTbpv2#म
— थोडक्यात (@thodkyaat) August 31, 2019
गेल्या ५० वर्षांत मी त्यांना कधीही असं चिडलेलं पाहिलं नाही- सुप्रिया सुळे- https://t.co/DTs1RIdyGG#म
— थोडक्यात (@thodkyaat) August 31, 2019
Comments are closed.