बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रानडे इन्स्टिट्यूटचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी; रानडे इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट देणार

पुणे | पत्रकारिता क्षेत्रातील प्रसिद्ध रानडे इंस्टिट्यूटचा वाद आता आणखी पेटताना दिसत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग गेल्या अनेक वर्षापासून विद्यापीठ काॅम्पसपासून विभक्त आहे. आता हा विभाग माध्यम आणि संज्ञापन विभागात स्तलांतरित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता. त्यानंतर आता या वादात शिक्षणमंत्र्यानी उडी घेतली आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत या प्रकरणी भाष्य केलं आहे. रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराच्या वादात आपण दोन्ही बाजू समजून घेणार असल्याचं उद्य सामंत यांनी म्हटलं आहे. शनिवारी पुण्यात येऊ आणि विद्यार्थ्यांची बाजू समजून घेऊ, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे. विद्यापीठाला आपण परस्पर निर्णय घेऊ देणार नाही, असं आश्वासन देखील सामंत यांनी दिलं आहे.

रानडे इंस्टिट्यूटचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. रानडेने आतापर्यंत अनेक दिग्गज पत्रकार दिले आहेत. विद्यापीठाने परिपत्रक काढून रानडे इंस्टिट्यूटचं स्थालांतर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रानडेच्या माजी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. रानडे इंस्टिट्यूटचा महत्त्व कमी करण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

दरम्यान, रानडे इंस्टिट्यूट पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. चालू किंमतीनुसार या जमिनीची किंमत सुमारे 400 कोटी रूपये आहे. त्यामुळे या जमिनीवर काही लोकांचा डोळा असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी उडी घेतल्यानं यावर कोणता निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

हिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

‘…तर निवृत्तीनंतर दोन कोटी मिळतील’; जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More