बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर रद्द, उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय

पुणे | पत्रकारितेच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा वाद चांगलाच पेटला होता. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी आज रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिली. आजी-माजी विद्यार्थी, पत्रकार संघटनांसोबतच्या भेटीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर कायमचं रद्द करण्यात आलं आहे.

रानडे इन्स्टिटयूट या नावाने प्रसिद्ध असला तरी हा पुणे विद्यापीठाचाच एक विभाग आहे आणि तो संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग या नावानेही ओळखला जातो. हा विभाग सध्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये नसून फर्गसन कॅालेज रस्त्यावर आहे. अनुदानित असलेला हा विभाग पुणे विद्यापीठात हलवून तो विनाअनुदानित कम्युनिकेशन स्टडीज विभागात विलिनीकरण करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठानं घेतला होता. या स्थलांतराला तसेच विलीनीकरणाला आजी माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघानंही विरोधाची भूमिका घेतली होती.

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी त्यांनी आजी माजी विद्यार्थी तसेच पत्रकारांशी चर्चा करुन त्यांची भूमिका समजावून घेतली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. मंगेश कोळपकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आता शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि परिसर सुधारणा होणे गरजेचे आहे, तसेच या इन्स्टिट्यूटच्या जमिनीच्या वादासंदर्भात नेमका तोडगा निघणं गरजेचं आहे. यासाठी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

No description available.

थोडक्यात बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More