बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश

पुणे | पुण्यातील पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परिपत्रक काढून रानडे इंस्टिट्यूटचं स्थालांतर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रानडेच्या माजी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. रानडे इंस्टिट्यूटचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर आता अखेर पुणे विद्यापीठानं माघार घेतली आहे.

विद्यापीठानं एक परिपत्रक काढून रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतरास अखेर स्थगिती दिली आहे. रानडे इंस्टिट्यूटमध्ये पुर्वीप्रमाणे पदविका अभ्यासक्रम पुर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याचं यात सांगितलं आहे. एकत्रित केलेल्या दोन्ही विभागाचे अभ्यासक्रमाचे वर्ग पुर्वीप्रमाणे सुरू राहतील, असं परिपत्रक विद्यापीठाच्या माध्यम समन्वयक कक्षाने काढलं आहे.

नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर करियर प्रमाणपत्र सुरू करण्यात यावेत. एस.सी.जे हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आवारात स्थलांतरित करून स्टुडिओसह सर्व भौतिक साधणं उपलब्ध करून द्याव्यात असं देखील या परिपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठातील ईएमएमआरसी आणि विद्यावाणी या संस्थांशी जोडण्यात यावं, असंही यात म्हटलं आहे.

दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी स्थलांतराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. याबद्दल माध्यामांमधून उलटसुलट बातम्या येत होत्या. त्या वस्तूस्थितीला धरून नाहीत,असं विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितिन करमळकर यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर हा वाद थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता.

थोडक्यात बातम्या-

…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

दिया मिर्झानं पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो!

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

चिंताजनक! कोरोना लस घेऊनही डेल्टा प्लस व्हेरिएंटची होतेय लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More