बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

मुंबई | बाॅलिवूडमध्ये कपूर परिवाराचा मोठा दबदबा आहे. मागील वर्षापासून कपूर परिवारावर अनेक संकटे आली आहेत. राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूरला कोरोना झाला होता. त्यानंतर अभिनेता रणबीर कपूरलाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

रणबीर कपूर सध्या क्वारंटाईन असून त्याच्या या तब्येतीबद्दल माहिती रणबीरचे चुलते रणधीर कपूर यांनी दिली आहे. रणबीर आजारी आहे, पण त्याला कोरोना झाला आहे का नाही याची मला माहिती नाही. मी सध्या शहराबाहेर आहे, असं रणधीर यांनी सांगितलंय.

रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना ‘जुग जुग जियो’च्या सेटवर कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर अभिनेता वरूण धवनलाही कोरोना झाला होता. तर बिग बी अमिताभ बच्चन, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमाचं शुटींग चालू आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे. तर आलिया आणि अयान यांच्या कोरोना अहवालाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

थोडक्यात बातम्या-

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादयक पाऊल!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत!

‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा

महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर पार्थ पवार, म्हणाले…

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More