बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रणबीर-आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार? शुटिंग थांबवल्याने चर्चांना उधाण

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि बाॅलिवूडचा चाॅकलेट बाॅय रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यातच आता आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या विवाहाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना यांच्या विवाहाची देखील जोरदार चर्चा होती. त्यानंतर सर्वात हिट कपक म्हणून आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्याकडे पाहिले जाते.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणे इटलीमध्येच हा विवाह संपन्न होण्याची शक्यता आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नात उपस्थिती अत्यल्प असणार आहे. त्यामध्ये काही मित्र आणि दोन्हीकडील कुटूंबियांचा समावेश असणार आहे.

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. विकी कौशल आणि कतरिनाचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध आहेत. हे दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचे देशभरात अनेक चाहते आहेत. त्यातच त्यांच्या विवाहाची बातमी समोर आल्याने चाहते खुप उत्सुक आहेत. गेल्या वर्षी देखील आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या विवाहाच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. मात्र, कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं, असं बोललं जातंय.

थोडक्यात बातम्या- 

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

“टीकाकारांनी टीका केली पण स्वत: सरकारनेच उत्तर दिलंय”

“असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार”

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या’; आणखी एका साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More