Animal चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘तो’ डिलीटेड सीन तूफान व्हायरल!

Ranbir Kapoor | बॉलीवुड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला होता. याचबरोबर रणबीरच्या भूमिकेचं देखील कौतुक झालं होतं. यामध्ये मुख्य भूमिका असलेल्या रश्मिकापेक्षा प्रेक्षकांना साइड रोलमध्ये असणारी अभिनेत्री तृप्ती डीमरीच अधिक भावली होती. त्यात रणबीर आणि तृप्तीची केमिस्ट्री देखील खूप चर्चेत होती. (Ranbir Kapoo)

मात्र, या चित्रपटातील काही सीन्समुळे वाद देखील झाला होता. खूप जास्त हिंसा दाखवण्यात आल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला होता. तसंच काही गोष्टीमागे काहीच तथ्य नसल्याचं देखील म्हटलं गेलं. जावेद अख्तर यांनी या चित्रपटावर खूप टीका केली होती. त्यांना चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनीही जशास तसं उत्तर दिलं होतं. अशात हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.

Animal चित्रपटातील ‘तो’ डिलीटेड सीन व्हायरल

सोशल मीडियावर सध्या अॅनिमल चित्रपटातील एक डिलिट करण्यात आलेला सीन तूफान व्हायरल होत आहे. संदीप रेड्डी वांगानं ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातून काही सीन्स डिलीट केले होते. त्यातील आणखी एक सीन हा सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे.

चित्रपटामध्ये जेव्हा रणबीर त्याचा भाऊ असलेला बॉबी देओलला जेव्हा मारतो त्यानंतरचा हा एक सीन आहे. व्हायरल झालेल्या या सीनला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले की हा शेवटचा सीन(Ranbir Kapoo) चित्रपटात का दिसला नाही. हाच डिलिट करण्यात आलेला सीन आता व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर चांगलेच संतापले आहेत.

व्हायरल सीनवर नेटकऱ्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया

रणबीर कपूर नशेत फ्लाइट कॉकपिटमध्ये जाण्याआधी आणखी एक ड्रिंक बनवतो. त्यानंतर तो कॉकपिटमध्ये असलेल्या पायलटच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला सीटवरून उठायला सांगतो. त्यानंतर पायलटच्या सीटवर बसलेला रणबीरच्या तोंडात सिगारेट असल्याचं दिसून येतंय. या सीनमध्ये कोणताही डायलॉग नाही. मात्र, बॅकग्राउंडला ‘पापा मेरी जान’ हे गाणं लावण्यात आलं आहे.
हाच सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एक्सवर हा सीन पोस्ट करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी देखील अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ‘या चित्रपटाचा मला दिग्दर्शकाचा कट व्हर्जन पाहायचा आहे’, असं एक नेटकरी म्हणाला. दुसरा नेटकरी म्हणाला, फ्लाइटमधला हा सीन या चित्रपटाला एका वेगळ्या स्थराला घेऊन जाऊ शकत होता. असाच एक शॉट हा चित्रपटात आहे जेव्हा फ्लाइट ही एका डोंगराला धडक देणार असते आणि संपूर्ण स्टोरी ही वेगळ्या स्तरावर जाते.(Ranbir Kapoo)

News Title :  Ranbir Kapoor Animal movie Deleted Scene Viral

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

“विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सतर्क! आज राज्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

“खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून..”; संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपंचमी सणाला नागदेवतांची पूजा ‘या’ वेळेपर्यंत करा; मिळतील शुभ संकेत