Ranbir Kapoor | अभिनेता रणबीर कपूर याने अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न करत संसार थाटला आहे. दोघांना राहा नावाची एक गोड मुलगी देखील आहे. दोघेही सुखी संसार करत आहेत. मात्र, आलिया भट्टपूर्वी रणबीर कपूरचे नाव हे अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोणसोबत जोडले गेले होते. दोघींसोबतही रणबीरचे अत्यंत घट्ट नाते समजले जात होते. रणबीरचे नाव प्रथम दीपिकाशी जोडले गेले. दोघेही लवकरच लग्न करणार, अशा चर्चा देखील तेव्हा रंगल्या होत्या. दीपिकाने तर रणबीरचे (Ranbir Kapoor) नाव देखील मानेवर गोंधले होते. मात्र, दोघांचेही नाते फार काळ टिकले नाही. नंतर रणबीरचे नाव हे कॅटरिनासोबत जोडण्यात आले.
रणबीर-कॅटरिनाच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर
रणबीर कपूर याच्यासाठी कॅटरिनाने सलमान खान याच्यासोबत असलेलं नातं देखील संपवलं होतं, असं म्हटलं जातं. कॅटरिना ही कपूर कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात सामील व्हायची. त्यामुळे नंतर रणबीर हा कॅटरिना सोबत लग्न करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. याबाबत रणबीरची बहीण तथा अभिनेत्री करीना कपूरने देखील मोठा खुलासा केला होता. अशात करीनाचा एक जुना व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये करीना कपूर ही रणबीर आणि कॅटरिना यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसून येत आहे.
व्हिडीओमध्ये करीना, रणबीर आणि कॅटरिना यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमधील हा व्हिडीओ आहे. व्हिडिओत करीना, रणबीर याला म्हणते, ‘तुझ्या लग्नात मी एकटी डान्स करणार आहे. चिकनी चमेली… शिला की जवानी.. कॅटरिनाच्या हीट गाण्यांवर मी एकटी डान्स करणार आहे…’ यावर रणबीर हसतो आणि म्हणतो की, ‘इतकी बोलत आहेस… जर होणार असेल तर…’दोघांच्या या संभाषणमुळे तेव्हा रणबीर (Ranbir Kapoor) आणि कॅटरिना लवकरच लग्न करणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
View this post on Instagram
रणबीर-दीपिकाच्या नात्याची चर्चा
करीना कपूरच्या या वक्तव्यानंतर रणबीर आणि कॅटरिना यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. चाहते देखील त्यांच्या लग्नाची वाट बघत होते. मात्र, रणबीरचे नाते कॅटरिनासोबत देखील जास्त काळ टिकले नाही. कॅटरिनानंतर रणबीरच्या (Ranbir Kapoor) आयुष्यात आलिया भट्ट आली. दोघांनी एमकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. त्यानंतर दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न देखील केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. राहा कपूर असं दोघांच्या मुलीचं नाव आहे.
दुसरीकडे कॅटरिना आणि दीपिका यांनी देखील संसार थाटला. कॅटरिनाने अभिनेता विक्की कौशलसोबत विवाह केला. तर, दीपिकाने रणवीर सिंह सोबत विवाह केला. दीपिकाने नुकत्याच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एकंदरीत दीपिका, कॅटरिना आणि रणबीर हे तिघेही आता आनंदी आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
News Title- Ranbir Kapoor Katrina Kaif relationship
महत्त्वाच्या बातम्या –
भूमिका देणार म्हणून झोपायला…; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ!
सूरजच्या कुटुंबियांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं!
1 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?
‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ यांची चिंता करू नये; भाजप नेत्याचा पलटवार
‘मुंबई’ पुन्हा टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याचा कट