Ranbir Kapoor | बॉलीवुड अभिनेता रणबीर कपूर याचं संपूर्ण खानदान सिनेसृष्टीशी निगडीत आहे. अगदी आजोबापासून ते आई-वडील, भाऊ-बहीण सर्व जण बॉलीवुडमधील दिग्गज कलाकार राहिले आहेत. आताच्या घडीला रणबीर कपूरचाही मोठा चाहता वर्ग आहे. दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत रणबीरचं देखील नाव घेतलं जातं.त्याचा नुकताच आलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट तर खूपच गाजला.
अशात रणबीर कपूर त्याच्या सुपरहीट चित्रपट ‘रॉकस्टार’ मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो आई-वडिलांच्या भांडणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. या मुलाखतीत रणबीरने ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्याविषयी मोठा खुलासा केला होता.
आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीरचा खुलासा
नीतू कपूर या बॉलीवुडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक राहिल्या आहेत.सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पुढे अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. अशात रणबीरने (Ranbir Kapoor ) दिलेल्या मुलाखतीमध्ये आई-वडिलांचं नातं कसं होतं. याबाबत मोठा खुलासा केलाय.
“मला अजूनही ते दिवस आठवतात.त्यावेळी मीडियामुळे एवढा फरक पडत नव्हता. कारण मीसुद्धा त्यावेळी खूप तापट होतो. मी माझ्या आई वडिलांसोबत राहतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तो कठीण काळ आला होता, त्याचा साक्षीदार मीसुद्धा होतो.”, असं रणबीर म्हणाला होता.
“पायऱ्यांवर बसून मी 4-4 तास त्यांचं भांडण..”
पुढे बोलताना त्याने एक किस्सा सांगितला. “मी ज्या बंगल्यात राहतो, तिथे माझे आई-वडिल खालच्या मजल्यावर आणि मी वरच्या मजल्यावर राहतो. मला अजूनही आठवतंय की मी पायऱ्यांवर चार-चार तास बसून असायचो. रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मी त्यांना भांडताना ऐकायचो. त्यांच्या रुममधून मला वस्तूंच्या तोडफोडीचा आवाज यायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो. फक्त माझे पालक सेलिब्रिटी असल्याने त्यांच्या भांडणाची चर्चा मीडियामध्ये होते.”,असा खुलासा रणबीरने (Ranbir Kapoor ) मुलाखतीमध्ये केला होता.
View this post on Instagram
“आई वडिलांमधील वादाच्या बातम्यांमुळे शाळेत मला थोडीशी लाज वाटायची. अशा घटनांचा उल्लेख तुमचे मित्र तुमच्याकडे करत नाहीत, कारण ते तुमचे चांगले मित्र असतात. पण मला माहित होतं की काय घडतंय. तरीसुद्धा तुम्ही त्याला सामोरं जाता”, असं रणबीरने पुढे सांगितलं.
News Title – Ranbir Kapoor Recalled Rishi And Neetu Kapoors Fights
महत्त्वाच्या बातम्या-
“मोदी फक्त गायीवर बोलतात महागाईवर बोलत नाहीत”, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका
महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट!
…म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहणार; सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा, थेट म्हणाले..
दोन लाख रुपये घे आणि अर्ज मागे घे, ‘या’ उमेदवाराने शिंदे गटावर केला आरोप