Top News देश

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

रांची | राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावलीये. सध्या त्यांच्यावर रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचार सुरुयेत.

सध्या लालू यादव यांचं मूत्रपिंड 25 टक्केच कार्यरत आहे. गेल्याच आठवड्यात लालू प्रसाद यादव यांना रूग्णालयातील खासगी वॉर्डात हलवण्यात आलं होतं.

लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणारे डॉ. उमेश प्रसाद म्हणाले, लालू यादव यांचं मूत्रपिंड 25 टक्के कां करत असून ते कधीही निकामी होऊ शकतं. यासंदर्भात आम्ही वरिष्ठांना माहिती देखील दिलीये.

लालू यादव यांना गेल्या जवळपास 20 वर्षांपासून डाबेटीजचा त्रास आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडतेय. शिवाय याच कारणाने त्यांच्या मूत्रपिंडाची परिस्थिती गंभीर होतेय, असंही डॉक्टरांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

मुंबई ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम; विदर्भ, कोकणाला पावसाचा इशारा

राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…

‘लोकहो, शेतकरी मरत आहे!’,म्हणत संजय राऊतांनी केलं आवाहन

शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं; प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

फेक टीआरपीप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; रिपब्लिक चॅनेलच्या ‘या’ व्यक्तीला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या