बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात कोरोनाची तिसरी लाट हाहाकार करणार? तज्ज्ञांनी केलं मोठं विधान

नवी दिल्ली |  कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेतून सावरत सर्व ठिक होत असतानाच विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनसह युरोपियन देशांमध्ये (European Country) कोरोनानं पुन्हा थैमान घातलं आहे. या देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लावून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतात तिसरी लाट येणार का? आल्यास तिचे स्वरूप आणि तीव्रता काय असेल? असे अनेक प्रश्न देशातील नागरिकांना पडले आहेत.

अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीचे व्यवस्थापक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleriya) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतात तिसरी लाट (Third Wave) आल्यास तिची तीव्रता पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत कमी असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण पार पडल्यानं तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं भाष्य गुलेरिया यांनी केलं आहे.

अशातच युरोपियन देशांमध्ये अधिक प्रमाणात लसीकरण होऊनही रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याबाबत तज्ज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. युरोपमधील जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) सांगितल्यानुसार येणाऱ्या काही महिन्यांत युरोपातील 53 देशांमध्ये सात लाख नागरिकांचा कोरोनानं मृत्यू होणार असल्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस तिसऱ्या बुस्टर डोसबाबत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची बैठक होणार असल्याचं समजतंय. या बैठकीबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

लहान मुलांचं लसीकरण आणि तिसऱ्या बुस्टर डोसबाबत ठाम निर्णय झाला नसल्यानं या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कमकुवत इम्युनिटी (Low Immunity) असणाऱ्या नागरिकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा तिसरा बुस्टर डोस (Booster Dose) देण्याचे सांगण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या

“सर्व कर्जबुडव्यांचा शोध घेतला जाईल आणि आपल्या देशाचा पैसा परत आणला जाईल”

मोठी बातमी! देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय मोठी घट

कोरोनानं टेंशन वाढवलं; WHO कडून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार?, आज होणार अंतिम निर्णय

‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी ड्रग्जची कहाणी’, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More