बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मायावती यांच्यावर केलेल्या अश्लिल वक्तव्यानं रणदीप हुड्डा अडचणीत; पाहा व्हिडीओ

मुंबई | कॅफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल या दोघांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. यावरुन सोशल मीडियावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता अभिनेता रणदीप हुड्डाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात केलेल्या एका वक्तव्याने तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणदीप हुड्डा एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहे. यात त्याने उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावर अश्लिल आणि जातीवाचक टीका करत त्यांची मस्करी केली होती. मी तुम्हाला एक ‘अश्लिल जोक’ ऐकवतो, असं तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

रणदीप हुडाचा जुना व्हिडिओ पाहून लोकांनी त्यांच्यावर कडाडून टीका करायला सुरुवात आहे. हा व्हिडिओ पाहून रणदीपने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. काही युझर्सने तसे ट्विटही केले आहे. तर ट्विटरवर #ArrestRandeepHooda असा ट्रेंड चालू आहे.

दरम्यान, मायावती कुरूप आहेत, त्यांची फक्त मूर्तीच उभी राहू शकते, असं वक्तव्य कॉमेडियन अबीश मॅथ्यूने याने केलं होतं. त्याच्या वादग्रस्त ट्विटनंतर अनेकांनी त्याच्यावर कडाडून टीका केली होती. त्यानंतर अबीश मॅथ्यूने याने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली होती.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“दुर्दैवाने मी आमदार झालो नाही, अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता”

लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून ‘या’ पुरवठादाराची माघार; मुंबई महापालिकेच्या अडचणीत वाढ

जलतरणपटू सुयश जाधवने महाराष्ट्राची मान आणखी उंचावली; रोहित पवारांकडून कौतुकाची थाप

अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे सरकार कोसळेल- तृप्ती देसाई

चेन्नई संघाला मोठा धक्का! कर्णधार धोनीचा CSK ला गुडबाय?; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More