Intercaste Marriage l अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hudda) आपल्या अनोख्या लग्नामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मणिपूरच्या लिन लैश्रामशी २०२३ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या रणदीपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या जातीबाहेरच्या लग्नाबद्दल आणि कुटुंबाच्या प्रतिक्रिया याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
रणदीप म्हणतो, “मी कधीच लग्न करणार नव्हतो. पण लिनला भेटल्यावर माझं मत पूर्णपणे बदललं. मी आमच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती आहे, ज्याने जातीबाहेर लग्न केलं.” त्याने हे लग्न पारंपरिक मणिपुरी पद्धतीने इंफाळमध्ये केलं आणि तेही अशा वेळी, जेव्हा मणिपूरमध्ये अस्थिर वातावरण होतं.
वरातीत पाहुण्यांपेक्षा जास्त सुरक्षा! :
रणदीपने सांगितलं की, “लग्नाच्या वेळी आमच्याकडे पाहुण्यांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक होते. आम्ही फक्त दहा जण होतो. आम्ही नवरीच्या कुटुंबावर कोणताही अतिरिक्त भार टाकू इच्छित नव्हतो.” त्यामुळे हा लग्नसोहळा अत्यंत साधा, पण लक्षवेधी ठरला.
रणदीपच्या म्हणण्यानुसार, “माझ्या आईवडिलांना मी माझ्याच जातीतील मुलीशी लग्न करावं, असं वाटायचं. पण जेव्हा मी मणिपुरी मुलीशी लग्न करत असल्याचं सांगितलं, तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले. नंतर मात्र त्यांनी मान्यता दिली.”
Intercaste Marriage l इंटरनेटशिवायही लग्न झालं ‘व्हायरल’ :
“मणिपूरमध्ये लग्नाच्या वेळी इंटरनेट नव्हतं, पण नंतर समजलं की आमचं लग्न इंटरनेटवर लाइव्ह दाखवलं गेलं होतं. आम्हालाही माहिती नव्हती की हे कोणी केलं!” असं रणदीपने हसत सांगितलं.
रणदीपने स्पष्टपणे म्हटलं, “प्रेम करताना माणूस धर्म, जात, देश किंवा वय पाहत नाही. माझं आणि लिनचं प्रेमही असंच होतं.” तो आणि त्याचं कुटुंब लष्करी अधिकाऱ्याच्या घरी थांबले होते, आणि भारतीय सैन्याच्या मदतीने लग्न सुरळीत पार पडलं.