बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मजुरांची हतबलता ड्रामेबाजी वाटते का तुम्हाला?’; सीतारमन यांच्या टीकेला रणदीप सुरजेवालांचं उत्तर

नवी दिल्ली | मजुरांची हतबलता तुम्हाला ड्रामेबाजी वाटते का?, रस्त्यांवर अनवाणी पावलांनी चालणारे शेकडो मजूर तुम्हाला ड्रामेबाज वाटतात?, असे प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना विचारलेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जावून ड्रामेबाजी करत आहेत, अशी टीका सीतारमन यांनी केली. त्यांच्या याच टीकेवरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळणं बंद करावं. ते मजूर आहेत, मजबूर नाहीत. श्रमिक आणि कामगारांचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. संवेदनहीन सरकारला सर्व मजुरांची माफी मागावी लागेल, अंस सुरजेवाला म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी मजुरांचं दु:ख वाटण्यासाठी त्यांच्याजवळ गेले होते. दु:ख वाटणं हा अपराध असेल तर हा अपराध आम्ही वारंवार करु. मूकबधिर सरकारला मजुरांच्या समस्येबाबत जागरुत करणं अपराध असेल तर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार तो अपराध करतील, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर

महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे

महत्वाच्या बातम्या-

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ‘तो’ दावा खोटा- अनिल देशमुख

सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात

‘श्रीमंत देश लॉकडाउन वाढवू शकतात, पण गरीब देश…’; चेतन भगतचा सरकारला टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More