बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रणधीर कपूर यांनी ‘या’ कारणाने वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय, म्हणाले…

मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. रणधीर यांच्या कर्मचारी वर्गातील 5 जणही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांनाही या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यात रणधीर यांनी एक मोठा खुलासा केला आहे की, ते ज्या ठिकाणी मोठे झाले, त्यांचे ते वडिलोपार्जित चेंबूरचे घर लवकरच विकण्यात येणार आहे.

‘राजीव बहुतेक वेळा माझ्याबरोबरच राहत असे. त्याचं पुण्यात एक घर होतं. मात्र, तो बरेच दिवस मुंबईत राहत होता. राजीवच्या मृत्यूनंतर मला एकटेपणा जाणवत होता, म्हणून मला वाटलं की आता मी माझ्या कुटूंबाच्या जवळ रहायला हवं’, असं रणधीर यांनी सांगितलं आहे. तसंच आपल्या वडिलोपार्जित घराविषयी सांगताना रणधीर म्हणाले की, ‘माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं होतं की, मी या घरात मला जेवढं वाटेल तेवढे दिवस राहू शकतो. मात्र, ज्या दिवशी मी हे घर विकेन, तेव्हा त्यातून मिळणारे पैसे मला ऋषी, राजीव, ऋतु आणि रीमा यांच्यात वाटून घ्यावे लागतील.’ रणधीर यांनी यापूर्वीच वांद्रे येथे घर विकत घेतले आणि ते आता पूर्णपणे तयार झाले आहे.

रणधीर कपूर आणि रीमा जैन यांनी दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे. रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील म्हणाले की, राजीव कपूरच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात.

दरम्यान, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं मालमत्तेवरील विवाद सोडवण्याच्या सुनावणीदरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेची आवश्यकता असल्यास त्यांनी राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्र न्यायालयात आणली पाहिजेत, ज्यात राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची ऑर्डर असली पाहिजे, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

…म्हणून तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More