बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल”

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशात दररोज कोरोनाचे अडीच लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. अशात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या चिंतेंत भर पडली आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट परतवून लावायला आता डिसेंबर महिना उजाडेल, असं गुलेरिया यांनी म्हटलंय.

2021 च्या अखेरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल. त्यानंतर 2022 च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेईल, असं रणदीप गुलेरिया म्हणालेत. ते इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या कोरोना स्थितीवर भाष्य केलं.

कोरोनाविषयी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करणं हाच मार्ग उरला असल्याचं गुलेरिया म्हणालेत.

ऑक्सिजन एक उपचार आहे. हा एक औषधाप्रमाणे आहे. थांबून-थांबून याचा वापर करणं काही उपयोगाचं नाही. असा कोणताही डेटा नाही, की जो दर्शवतो कोरोना रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार आहे की नाही. म्हणून हा निरुपयोगी सल्ला आहे, असंही गुलेरिया यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसला…’; शिवसेना खासदाराचा धक्कादायक आरोप

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More