बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे”

जळगाव | महाराष्ट्रातील बऱ्याच भागाची मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळल्यानं जिवित आणि वित्तहाणी झाली आहे. अशा परिस्थितीत देखील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावरुन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. राणेंच्या टीकेला आता शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सध्या महाराष्ट्रावर मोठं संकट आहे. या बिकट परिस्थितीत राजकारण करायला नको. राज्यावरील संकटाबाबत बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांना पांढऱ्या पायाचे म्हटलं होतं. परंतु, राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

तसेच गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणच करायचे असेल तर त्यासाठी खूप आराखडे आहेत. वेळ आल्यावर प्रत्येकाने आपापला झेंडा घेऊन उतरा. मात्र, अशा परिस्थितीत राजकारण करणे योग्य नाही.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या टीकेनंतर अद्याप नारायण राणेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पाटलांच्या टीकेनंतर आता नारायण राणे यांच्याकडून काही तिखट प्रतिक्रिया येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

काय सांगता! कोंबडा गेल्यावर मालकाने वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

घरात-दुकानात पाणी शिरलेल्यांना ‘इतक्या’ हजारांची मदत; ठाकरे सरकारचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More